Sat. May 30th, 2020

…आणि पळून जाणारा मुलगा Social Mediaमुळे आई-वडिलांच्या ताब्यात

आई वडिलांवर रुसून रेल्वेने बाहेरगावी पळून जाण्यासाठी आलेल्या मुलाला Social Mediaवरील मेसेजमुळे एका तरुणाने ओळखले.

त्याचे मतपरिवर्तन केल्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत मुलाला आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. हा प्रकार शहरातील रेल्वे स्थानकावर घडला आहे.

नेमकं काय घडलं ?

  • सचिन सीताराम कातोरे हा 14 वर्षीय मुलगा काल रेल्वे स्थानकावर आला, तो बाहेरगावी पळून जाणार होता.
  • मात्र सचिनचा फोटो तसेच तो सकाळपासून घरातून निघून गेला आहे. कोणाला आढळल्यास अथवा दिसल्यास संपर्क करा, असा मेसेज Whatsappवर व्हायरल करण्यात आला होता.
  • हा मेसेज रेल्वे स्थानकावरील वृत्तपत्र विक्रेते मिथुन पांडे यांनी पाहिला होता.
  • रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या सचिनला पांडे यांनी ओळखले. मिथुन यांनी सचिनबरोबर चर्चा केली. तेव्हा तो मला बाहेरगावी रेल्वेने जायचे आहे, असे सांगत होता.
  • मात्र व्हॉट्सअपवरील मेसेजमुळे मिथुन पांडे यांनी त्याचे मतपरिवर्तन केले. नंतर त्याच्या पालकांना फोन केला.

त्यानंतर मिथुन पांडे यांनी रेल्वे स्थानक प्रमुख एन.पी.सिंग, पोलीस हवालदार युनूस पठाण, पोलीस नाईक वैद्यनाथ बढे, पोलीस कर्मचारी सचिन गुप्ता, रेल्वे पोलीस दलाचे उपनिरीक्षक नेमीचंद मिना, तिकीट तपासनीस हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत सचिनला त्याच्या पालकाच्या स्वाधीन करण्यात आले.

Social Mediaवरील माहिती आणि तरुणाच्या सतर्कतेमुळे घरातून रुसून बाहेरगावी चाललेला 14 वर्षीय सचिन त्यांच्या आई-वडिलांना सुखरुप मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *