Mon. Sep 23rd, 2019

मुंबईच्या रस्त्यांवर अवैध पार्किंग केल्यास 10 हजारांचा दंड

0Shares

मुंबईत अनधिकृत पार्किंग केल्यास आता वाहनचालकाला 1000 रुपये ते 10 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी हा आदेश काढला असून 7 जुलै पासून याची अंमलबजावणी होणार आहे.मात्र मुंबईकर इतका मोठा दंड  भरणार का हा प्रश्न आहे.

10 हजार रुपयांपर्यंत दंड

अनेकदा पैसे वाचवण्यासाठी मुंबईकर रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून जातात मात्र आता मुंबईकराना अशा अनधिकृत पार्किंग साठी 10 हजर रुपायांपर्यंतचा दंड भरावा लागणार आहे.

वाहनतळांलगतच्या एक किलोमीटर रस्त्यावर तसेच दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणाऱ्या छोटय़ा रस्त्यांवर वाहने उभी करून मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा आणणाऱ्यांवर ही कारवाई केली जाणार आहे.

ज्या गाड्या मोठ्या रस्त्याला जोडणऱ्या रस्त्यांवर अनधिकृतपणे असतील अशांवर ही कारवाई होणार आहे. मात्र या कारवाईमुळे अनधिकृत पार्किंग थांबेल का हा महत्वाचा प्रश्न आहे.

एकीकडे मुबंईत अपुरे वाहनतळ त्यात वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांची संख्या ही वाढलेली अशात पार्किंग कुठे करायची हा सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रश्न आहे.

अनधिकृतपणे उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिकेने कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचे आदेश पालिकेला  देण्यात आले आहेत.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *