Tue. Jun 28th, 2022

निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला

गेल्या काही दिवसांपासून जम्मू- श्रीनगर महामार्गावर एका बोगद्याचं काम सुरू आहे. तिथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जम्मू – श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर बोगद्याचा काम सुरू असताना  काही भाग गुरुवारी रात्री कोसळला आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडील आहे. या अपघातात नऊ जण अडकले होते, त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना रामबन जिल्ह्यात घडली असून यावेळी रामबनचे उपायुक्त, प्रकल्प संचालक, पोलीस महासंचालक आणि एसएसपी उपस्थित होते.

निर्माणाधीन चार लेन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने नऊ जण अडकले, त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. तर उर्वरित सात जणांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरू आहे. प्रशासनाला माहिती मिळताच, तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खूनी नाल्यातील बोगद्याच्या समोरचा एक छोटासा भाग तपासणी दरम्यान कोसळला. त्यामुळे ही दुर्घटना घडली. माहिती मिळताच पोलीस आणि लष्करानं तातडीनं संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बोगद्यात अडकलेले लोक ऑडिट कऱणाऱ्या कंपनीचे लोक आहेत.

त्यावेळेस बोगद्यासमोर बुलडोझर आणि ट्रक बरोबकृर अनेक मशिन वाहने उभी होती त्यामुळे बोगदा कोसळल्याने त्याचेही पुर्ण नुकसान झाले आहे. दरम्यान या दुर्घटना झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या बचाव मोहिमेसाठी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. रामबनचे उपायुक्त मसरतुल इस्लाम आणि एसएसपी मोहिता शर्मा बोगद्यात सुरू असलेल्या बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.