Wed. Jun 26th, 2019

‘प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’, म.रे.विरोधात प्रवासी संघटना आक्रमक!

0Shares

दररोज उशिराने धावणाऱ्या मध्य रेल्वेविरोधात आता रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मध्य रेल्वे वेळेवर धावली नाही, तर आता थेट आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रवासी संघटनांनी दिला आहे.

मागील काही दिवसांपासून सातत्यानं मध्य रेल्वे उशिराने धावतेय.

कधी तांत्रिक बिघाड, कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड, तर कधी रेल्वे रुळांना तडे गेल्यानं मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडतो.

मात्र मध्य रेल्वे जर दर रविवारी प्रवाशांना वेठीस ठेवून मेगाब्लॉक घेत असेल, तर अशा समस्या उद्भवतातच कशा? असा प्रवाशांचा सवाल आहे.

या प्रकारांमुळे दररोज चाकरमान्यांना कामावर पोहोचायला उशीर होत असल्यानं प्रवाशांमध्ये रोष आहे.

याविरोधात शुक्रवारी मध्य रेल्वेवरील सर्व रेल्वे प्रवासी संघटनांची एकत्रित बैठक झाली, ज्यात आता मध्य रेल्वे वेळेवर धावली नाही, तर उग्र आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली.

शिवाय ठाण्यापासून कल्याण, डोंबिवली, टिटवाळ्यापर्यंतचा एकही खासदार या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याची नाराजी व्यक्त करत पुढील आंदोलन खासदारांच्या विरोधात करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: