Fri. May 7th, 2021

पिकअवरला प्रवाशांकडून आकारणार तिकीटाचे जादा पैसे ?

मुंबईकरांसाठी लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल आता गर्दीच्या काळात जादा तिकीट दर भरावे लागण्याची शक्यता आहे. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांसाठी वन नेशन वन कार्ड योजना सुरू करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. उपनगरीय लोकल चालविण्याचा तोटा वसूल करण्यासाठी प्रवाशांकडून गर्दीच्या काळात जादा तिकीटाचे दर आकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रवाशांकडून आकारणार तिकीटाचे जादा पैसे –

मुंबईकरांना गर्दीच्या काळात जादा तिकीटाचे पैसे मोजावे लागणार असल्याची शक्यता आहे.

एकाच तिकीटावर रेल्वे, मेट्रो आणि बेस्टचा प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्ड आणण्याची तयारी सुरू केली आहे.

तसेच बॅंकेसोबत करार करणार असून बॅंकेलाच स्मार्ट कार्ड तयार करण्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने स्मार्टकार्डचा प्रारूप आराखडा केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे.

त्यामुळे रेल्वेचे भाडे विमानांच्या तिकीटांप्रमाणे डायनामिक फेअर पद्धतीने वसुल होणार आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने प्रस्तान मान्य केल्यानंतर मुंबईकरांना पिकअवरला जादा पैसे मोजावे लागणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *