Mon. Sep 27th, 2021

धक्कादायक! प्रवासी जोडप्याने केली Uber ड्रायव्हरची हत्या!

रात्रीच्या प्रवासात जशी ड्रायव्हरची खात्री नसते. तशीच प्रवाशांची पण खात्री नसते. दिल्लीमध्ये एका जोडप्याने Uber चालकाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे नाल्यात फेकून दिले. हत्या करणाऱ्या जोडप्याला ड्रायव्हरची Uber विकून उत्तर प्रदेशमध्ये विकायची होती. पोलिसांनी आठवडाभराने या आरोपी जोडप्याला अटक केली.

कशी केली हत्या ?

29 जानेवारीला ड्रायव्हर गोविंदने मदनगीरा ते गाशीरा अशी ट्रीप पूर्ण केली.

त्यावेळी रात्री 1च्या सुमारास एका जोडप्याने गाझियाबादसाठी cab बुक केली.

गाझियाबादमध्ये पोहोचल्यानंतर जोडप्याने त्याला आपल्या घरी नेले.

त्याच्या चहामध्ये गुंगीचे औषध मिसळून त्याला दिले.

त्यानंतर गोविंद बेशुद्ध अवस्थेत असताना दोरीने त्याचा गळा आवळून जोडप्याने त्याची हत्या केली.

जोडप्याने गोविंदचा मृतदेह घरात ठेवला आणि त्याची उबर कार घेऊन मोरादाबादला गेले.

तिथे त्यांनी झुडुपात गाडी लपवून ठेवली

त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरी आले.

मृतदेहाचे तीन तुकडे करून ते नाल्यात फेकले.

पोलिसांना नाल्यामध्ये हे मृतदेहाचे तुकडे आढळल्यावर त्यांनी तपास सुरू केला. आठवडाभरात त्यांनी जोडप्याला अटक केलं. गोविंदची Uber विकून उत्तर प्रदेशमध्ये विकायचा आपला डाव असल्याचं त्यांनी आपल्या कबुलीजबाबात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *