Mon. Sep 20th, 2021

रेल्वेत बसण्याच्या वादावरुन सहप्रवाशाला रेल्वेबाहेर फेकले

मुंबई : रेल्वे लोकलमध्ये होणारे वाद काही नवीन नाही. रेल्वेत बसण्याच्या वादावरुन सहप्रवाशाला चालत्या रेल्वेतून बाहेर फेकल्याची घटना समोर आली आहे. हार्बर लाईनवरील मानखुर्द- टिळक नगर स्थानकादरम्यान हा प्रकार घडला. ही घटना आज सकाळी 9 च्या दरम्यान घडली.

विजय गुप्ता हे मानखुर्दवरून सीएसएमटीला जाणाऱ्या ट्रेन मध्ये चढले. ट्रेनमध्ये बसण्याच्या जागेवरून काही व्यक्तींबरोबर त्यांची शाब्दिक चकमक झाली. नंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचले. कुर्ला स्थानक येण्याआधी विजय यांना मारहाण करुन चालत्या रेल्वेतून फेकून दिले. फेकून दिल्याने विजय रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडले.

यामुळे विजय यांच्या उजव्या हाताला आणि डोक्यामागे जबर मार बसला आहे. विजय यांना सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. विजय यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. यासर्व घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *