वीज खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू

कोल्हापुरात वीज खंडित झाल्याने वेंटिलेटरवर असलेला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयच्या आवारात भरपावसात ठिय्या आंदोलन केले आहे. आंदोलन करत नातेवाईकांनी महावितरण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. करवीर तालुक्यातील उचगाव येथील ओमेश काळे यांना घरातच वेंटिलेटर लावला होता. त्यांना फुप्फुसाचा आजार असल्याने गेले वर्षभर घरातच त्यांचे उपचार सुरू होते.
थकित वीज बिलापोटी त्यांच्या घराची वीज कनेक्शन महावितरणने बंद केले होते. त्यामुळे शेजारून वीज घेऊन त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी रात्री पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि यातच ओमेश यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकढून होत आहे.पण अखेर ओमेशच्या मृतयूनंतर महावितरणाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.संतापलेल्या कुटुंबीयांकडून महावितरणच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले आहे.
कोल्हापूर शहरात संध्याकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली . तर अनेक भागात रस्त्यावर पाणीच पाणी साचून राहिले.विजांचा कडकडाट आणि गारांसह काही भागात पाऊस झाला.याचा फटका नागरिकांना बसला आहे