Sat. Oct 1st, 2022

निकाला आधीच पटोले नागपूरला रवाना – अनिल बोंडे

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची ठरणार आहे. विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होणार आहे. त्यामुळे भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात खरी लढत होणार आहे.

दरम्यान, काँग्रेसने भाजपाच्या दोन आमदारांवर आक्षेप नोंदवला. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळले आहेत. राज्यात झिडकारल्यावर काँग्रेसने केंद्रीय आयोगाकडे तक्रार केली आहे. अशातच, भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी लक्षवेधी ट्विट केले आहे.

विधानपरिषदेचा निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूरकरिता रवाना झाले असल्याचे अनिल बोंडे यांनी ट्विट करत सांगितले आहे. अनिल बोंडे यांनी ट्विट केले की, ‘नाना पटोले नागपूरकिरात रवाना… काँग्रेसचा उमेदवार पराभवाची निश्चिती.’

तसेच, काँग्रेसला अवदसा आठवली, योध्यांचाही अपमान केला. काँग्रेसला निष्ठावंतांची किंमतच कशी कळणार? सगळी गद्दारांची फौज, असे ट्विट करत बोंडे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.