Jaimaharashtra news

हे हॉटेल करतंय भारतीय सैनिकांचा ‘असा’ सन्मान!

भारतीय सैनिकांबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात आदर आहे. देशासाठी तळहातावर शीर घेणाऱ्या या सैनिकांमुळे आपण करोडो देशवासी सुखाने जगत आहोत. अशाच सैनिकांप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एका हॉटेलने स्तुत्य पाऊल उचललं आहे.

गोपाळ हॉटेल अँड रेस्टॉरंट या हिमाचल प्रदेशातील हॉटेलने सैनिकांसाठी विशेष सवलत ठेवली आहे.

या हॉटेलमध्ये  सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाला राहणं, खाणं पिणं या सर्वांवर 50% Discount देण्यात आलंय.

तर शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना या सर्व गोष्टी पूर्णपणे मोफत देण्यात येत आहेत.

लष्करी गणवेषात न येऊ शकलेल्या सैनिकांना 25% discount देण्यात येतं.

लष्कराच्या uniform मध्ये येणाऱ्या सैनिकांना 50 % सवलत मिळते.

अशा पद्धतीने हे हॉटेल आपल्या सेवेद्वारे सैनिकांना सन्मान देण्याचा प्रयत्न हॉटेलचे मालक करत आहेत. अशाच प्रकारे सैनिकांना सन्मान दिला तर आपणही देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांच्या ऋणातून अंशतः उतराई होऊ शकू.

Exit mobile version