Jaimaharashtra news

भारताच्या मदतीसाठी पुढे आला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर

भारतातील वाढत्या कोरोना संक्रमणादरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार बॉलर पॅट कमिन्सने मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना काळात गरजूंना मदत करण्यासाठी पीएम केअर फंडला 50,000 डॉलर देण्याची घोषणा पॅट कमिन्सने केली आहे.

देशात दररोज तीन लाखाहून अधिक रुग्णांची वाढ होत आहे. ऑक्सिजनअभावी भारतात अनेकांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्या वाढल्याने ऑक्सीजन प्रचंड मागणी वाढली आहे.

आयपीएलमध्ये पॅट कमिन्स कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. ‘भारत एक असा देश आहे ज्यासाठी गेल्या काही वर्षांत माझे प्रेम सतत वाढले आहे. इथले लोक चांगले आहेत. सध्या मोठ्या संख्येने कोरोना विषाणूमुळे लोकांना अस्वस्थ होतांना पाहून मी निराश झालो आहे’,असं ट्विट त्याने केलं आहे.

‘एक खेळाडू म्हणून मला आयपीएलमध्ये खेळून कोट्यावधी चाहत्यांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. हे लक्षात घेऊन मी पीएम केअर फंडला पन्नास हजार डॉलर्स देण्याचे ठरविले आहे. विशेषतः मी ही रक्कम गरजूंना ऑक्सिजन खरेदी करता येईल यासाठी देत आहे. मला माहित आहे की मी दान केलेली रक्कम मोठी नाही, परंतु मला आशा आहे की याचा नक्कीच काही ना काही फायदा होईल’, असंदेखील पॅट कमिन्सने म्हटलं आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Exit mobile version