Jaimaharashtra news

निर्भया हत्याकांडातील दोषी पवनच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र या चौघा नराधमांपैकी पवन गुप्ता या गुन्हेगाराच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. आपण गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याचा हवाला देत आपल्याला फाशीची शिक्षा देऊ नये, अशी याचिका त्याने सुप्रीम कोर्टात केली होती.

निर्भयावर बलात्कार झाला, त्यावेळी आपण 16 वर्षाचे होतो.

त्यामुळे आपल्याला फाशीची शिक्षा देण्यात येऊ नये, अशी याचिका पवन गुप्ताने सुप्रीम कोर्टात केली होती.

दिल्ली हायकोर्टाने यापूर्वी पवनची याचिका फेटाळून लावली होती, तसंच त्याला 25 हजारांचा दंड ठोठावला होता.

सुप्रीम कोर्टातही ही याचिका फेटाळून लावण्याचीच शक्यता वर्तवली जातेय.

सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यास पवनकडे शेवटचा पर्याय असेल, तो म्हणजे राष्ट्रपतींकडे दया अर्ज दाखल करणे.

राष्ट्रपतींनी त्यावर सही केल्यास पवनची मृत्यूदंदापासून मुक्तता होऊ शकते.

मात्र यापूर्वी निर्भया कांडातील दोषी मुकेश याचा दया अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळून लावला होता.

Exit mobile version