Wed. Jun 29th, 2022

Pavitra Rishta 2.0: शाहिर शेख,अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात आपल्या वेगळेपणासाठी लोकप्रिय झालेली मालिका ‘पवित्र रिश्ता’ पुन्हा एका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी भेटीला आहे. ‘पवित्र रिश्ता’

या मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली असून या मालिकेचे फर्स्ट लूक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोत शाहिर शेख आणि अंकित लोखंडे हे अगदी साध्या लूकमध्ये दिसत आहे. या फोटोंना शाहिर शेख (shahir shekh and ankita lokhande) आणि अंकिता लोखंडेनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेयर केले आहे. या दोघांनाही चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.

गेल्या दीड वर्षभरापासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहेत. त्याला मनोरंजन क्षेत्रही अपवाद नाही. आतापर्यंत कित्येक मालिकांचे चित्रिकरण सुरु झालेलं नाही. अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. याशिवाय टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील(tv entartainment) काही सेलिब्रेटींनी कोरोनामुळे आपल्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्र वेगळ्या परिस्थितीनतून जातान दिसत आहे.

 

पवित्र रिश्ता मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात झाल्यानं चाहत्यांना दिलासा मिळणार असून या मालिकेचा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे. अभिनेता शाहिर शेख हा या मालिकेत मानवच्या भूमिकेत झळकणार आहे. ही भूमिका एकेकाळी दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतनं (sushant singh rajput) केली होती. तर त्याची मैत्रीण अंकिता लोखंडे (ankita lokhande) ही अर्चनाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचा फर्स्ट लूक शाहीर आणि अंकितानं सोशल मीडियावर शेयर केला आहे.

 

तसेच पवित्र रिश्ता मालिकेचे दुसरे पर्व कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मालिकेची चर्चा ही सोशमीडियावर सुरू होती. या मालिकेचा डिजिटल रिमेक आता प्रेक्षकांसमोर काही दिवसांत येणार आहे. फर्स्ट लूक शेयर करताना संबंधित कलाकारांनी लिहिलं आहे की, पुन्हा एकदा नव्या भूमिकेत येतो आहे. याचा मनस्वी आनंद आहे. पवित्र रिश्तामधील ती एक आगळी वेगळी प्रेमकथा आहे. ती काही साधीसुधी नाही तर फारच वेगळी आहे. अल्ट बालाजीवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मालिकेच्या मेकर्सनं शाहिर आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचाही फोटोही शेयर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.