Fri. Aug 12th, 2022

पवार भाजपाविरोधांचे बनले नेता

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारीसाठी नकार दिला आहे. त्यानंतर आज नवी दिल्लीत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची बैठक बोलावली. या बैठकीचे अध्यक्षपद पवारांकडे देण्यात आले त्यामुळे या बैठकीत शरद पवार भाजपाविरोधकांचे नेता बनले.

राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून शरद पवार यांनी पुढे यावे, यावर या बैठकीत चर्चा झाली. तसेच पवारांच्या उमेदवारीला सर्वांचे सहमत झाले. मात्र, पवारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार बनण्यास नकार दिला आहे.

ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीत शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरावे यासाठी त्यांना आग्रह करण्यात आला. मात्र, शरद पवारांनी यासाठी नकार दिला आहे.

बैठकीला कोणते नेते उपस्थित होते?

ममता बॅनर्जी यांनी बोलावल्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, वामचे दीपांकर भट्टाचार्य, आरजेडीचे मनोज झा, पीडीपीकडून महबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फ्रेंसचे फारूक अब्दुल्ला, काँग्रेसकडून रणदीप सुरजेवाला, मल्लिकार्जुन खरगे आणि जयराम रमेश, सपाकडून अखिलेश यादव, आरएलडीचे जयंत चौधरी आणि डीएमकेचे टी आर बालू इत्यादी नेते उपस्थित होते.

बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, शरद पवारांनी उमेदवारीसाठी रिंगणात उतरले तर चांगलेच होईल, अन्यथा आम्ही संयुक्त उमेदवाराच्या नावावर विचार करू.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.