Mon. Aug 15th, 2022

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून पवारांनी अंग काढलं

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून पवारांनी अंग काढून घेतले आहे. भाजपाविरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करताना पवार राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरावेत अशी अनेक भाजपाविरोधकांची इच्छा होती. मात्र, शरद पवारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार बनण्यास नकार दिला आहे.

शरद पवारांनी ट्विट करत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्विट केले की, दिल्लीत झालेल्या बैठकीत राष्ट्रपती पदासाठी माझे नाव सुचवल्याबद्दल मी सर्व विरोधी पक्षांचे आभार मानतो. मात्र, मी हा प्रस्ताव नम्रपणे नाकारत आहे. मी सामान्य माणसाच्या हितासाठीच काम करू इच्छितो.

आज नवी दिल्लीत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची बैठक बोलावली. या बैठकीचे अध्यक्षपद पवारांकडे देण्यात आले त्यामुळे या बैठकीत शरद पवार भाजपाविरोधकांचे नेता बनले. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून शरद पवार यांनी पुढे यावे, यावर या बैठकीत चर्चा झाली. तसेच पवारांच्या उमेदवारीला सर्वांचे सहमत झाले. मात्र, पवारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार बनण्यास नकार दिला आहे.

पवारांना काँग्रेसचा पाठिंबा, भुजबळ आनंदी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीसाठी पाठिंबा दिला आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार राष्ट्रपती होणे अभिमानास्पद असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रातून शरद पवार हे राष्ट्रपती यासारख्या मोठ्या पदावर गेल्यास महाराष्ट्र नक्कीच आनंदाची व गर्वाची गोष्ट करता राहील, असे छगन भुजबळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.