Fri. Sep 30th, 2022

पत्राचाळ घोटाळ्यात पवारांचे नाव ?

पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आधीच तुरुंगात आहेत. त्याच पत्राचाळ प्रकरणात आता शरद पवारांचं नाव आले आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावर बोट ठेवत याप्रकरणातल्या सहभागाविषयी शरद पवारांचीही चौकशी करण्याची मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकरांनी केली आहे. याबाबतीत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे.

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात गुरुआशिष कंपनीला काम देण्यात यावं, यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांच्या उपस्थितीत संजय राऊतांनी बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भातळखकरांनी आपल्या पत्रातून उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे.

पत्राचाळ घोटाळा आरोपांवर शरद पवारांची प्रतिक्रिया

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्य सरकारला आव्हान दिलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी करायची असेल तर लवकरात लवकर करा. आम्ही चौकशीला जाण्यासाठी तयार आहोत. पण, चौकशीनंतर आरोप सत्याला धरून नसेल, तर आरोप करणाऱ्यांवर सरकार काय करणार ?, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

1 thought on “पत्राचाळ घोटाळ्यात पवारांचे नाव ?

  1. Youre so cool! I dont suppose Ive read something like this before. So nice to search out anyone with some authentic ideas on this subject. realy thanks for beginning this up. this web site is something that is wanted on the net, somebody with a little originality. useful job for bringing one thing new to the web!

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.