Mon. Aug 15th, 2022

आजपासून टोलनाक्यांवर FASTag बंधनकारक

देशातील सर्व मार्गावर आजपासून फास्टटॅग बंधनकारक आहे. त्यामुळे ज्यांनी फास्टटॅग प्रणाली कार्यान्वित केलेली नाही, त्यांच्याकडून दुप्पट टोल आकारणी केली जाणार आहे.
पण प्रत्यक्षात पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर याची अंमलबजावणी सुरू झाली नसल्याचं दिसून येत आहे. या ‘फास्टॅग’ची मुदत पाच वर्षांची असेल. त्यानंतर नव्याने टॅग खरेदी करावे लागणार आहे. कार, जीप, व्हॅन आणि यांसारख्या वाहनांना ‘फोर’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवले जाणार आहेत. तर हलक्या मालवाहू आणि व्यावसायिक वाहनांना ‘फाइव्ह’ क्लासचे, थ्री अ‍ॅक्सेल व्यावसायिक वाहनांना ‘सिक्स’ क्लासचे आणि बस आणि ट्रकना ‘सेव्हन’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवण्यात येणार आहेत. आता एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय यासह २५ नामांकित बँकेच्या शाखांमधून किंवा ऑनलाइन फास्टॅग विकत घेता येणार आहे. शिवाय काही अॅप जसे पेटीएम, अ‍ॅमेझॉन आणि माय फास्टॅग अ‍ॅपवरही सुविधा उपलब्ध असणार आहे. याशिवाय फास्टॅग बँकेत उपलब्ध असून तो २०० रुपयांना मिळेलं. हा टॅग कमीत कमी १०० रुपयांपासूनही रिचार्ज करून मिळेल.

केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२१ पासून सर्व चार चाकींसह अन्य वाहनांना फास्टॅग अनिवार्य केले आहे. परंतु ज्या वाहनचालकांकडून याची अंमलबजावणी होत नसेल, त्यांना थर्ड पार्टी इन्शुरन्स दिला जाणार नाही. एप्रिल २०२१ पासूनही त्याची अंमलबजावणी करण्याचा विचार मंत्रालयाकडून होत आहे. फास्टॅग एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. फास्टॅग मिळवण्यासाठी कार मालकाचे केवायसी कागदपत्र, ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व मालकाचा फोटो हवा एक लाख रुपयांपर्यंत फास्टॅग रिचार्ज करता येणार असून बचत खात्याला लिंक करता येईल. डेबिट-क्रेडिट कार्ड, आरटीजीसी, चेकद्वारे टॅग ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा टोल नाक्यावरून जाताना वाहनचालकांना वाहनाचा वेग कमी ठेवावा लागेल. असं काही नियम आहे. आता नवीन वर्षांत महामार्ग प्राधिकरणाने टोलनाक्यांवरील सर्वच मार्गिकांवरच ‘फास्टॅग’ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून रोख रक्कम भरण्याचा पर्याय नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.