Sun. Apr 5th, 2020

कामकाज संपेपर्यंत कोपऱ्यात बसून राहा, नागेश्वर राव यांना सुप्रीम कोर्टाची शिक्षा

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी सीबीआयचे माजी संचालक नागेश्वर राव यांना मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे.

नागेश्वर राव यांना दोषी ठरवत कोर्टाने त्यांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मुझफ्फरपूर जिल्ह्यातील वसतीगृहात राहणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार गेल्या वर्षी समोर आला होता.

सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची बदली करु नये, असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने यापूर्वी झालेल्या सुनावणीत दिले होते.

मात्र यानंतरही या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती.

यासाठी तत्कालीन संचालक नागेश्वर राव यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले होते.

सोमवारी नागेश्वर राव यांनी सुप्रीम कोर्टात लेखी माफी मागितली होती.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत नागेश्वर राव यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी नागेश्वर राव यांना कोर्टाने दोषी ठरवत 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

इतकंच नव्हे, तर राव त्यांना दिवसभराचं कामकाज होईपर्यंत न्यायालयात उभं राहण्याची शिक्षादेखील करण्यात आली आहे.

कामकाज संपेपर्यंत कोपऱ्यात बसून राहा, नागेश्वर राव यांना सुप्रीम कोर्टाची शिक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *