Tue. Sep 27th, 2022

‘प्रियंका गांधींसोबत सनी लिओनीलाही उभं करा’, पायल रोहतगीच्या विधानावर Netizens संतप्त

काँग्रेसने प्रियंका गांधी यांना अखेर मैदानात उतरवलं. त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. प्रियंका गांधींचं काहींनी स्वागत केलं तर काहींनी टीकासुद्धा केली.

एकेकाळी बी-ग्रेड सिनेमांमधून नाव कमावणारी अभिनेत्री आणि बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमधील कंटेस्टण्ट पायल रोहतगी हिने मात्र या नेमणुकीबाबत वादग्रस्त विधान केलं. एवढंच नव्हे, तर तिने सनी लिओनीलाही या वादामध्ये ओढलं. त्यामुळे नेटिझन्स तिच्यावर चांगलेच संतापले.

संबंधित बातमी- लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसची खेळी; प्रियंका गांधींवर सरचिटणीसपदाची जबाबदारी

रोहतगीने ट्विट केलंय. ‘ते म्हणतात की इंदिरा गांधींनी पंतप्रधान होण्यासाठी लाल बहादूर शास्त्रींना मारलं, त्यांनी त्यांचा मुलगा संजय गांधींचीही हत्या केली असून त्या हुकूमशाह होत्या. आपल्याला अजून एका हुकूमशाहची गरज आहे का ? रक्त आणि दिसण्यातील साधर्म्यामुळे गुणधर्मही सारखे असू शकतात.’

रोहतगी विरुद्ध अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.  इतकी टीका होत असतानाही रोहतगीने थांबायचे नाही ठरवले आणि पोर्न स्टार सनी लिओनीचा उल्लेख केला.

रोहतगीने Tweet केले की, ‘प्रियंका गांधींसोबत पॉर्न स्टार सनी लिओनीलाही उभं करा. ती बॉक्स ऑफिससोबत बेडरुम स्टोरीजमध्येही हिट आहे. भारतीयांना गोरा रंग आवडतो आणि फुकटचं सेक्ससंबंधी ज्ञानही मिळेल.’

संबंधित बातमी- मोदींची प्रियंका गांधींवर टीका “काही लोकांसाठी परिवारच पक्ष असतो”

नेटिझन्सनी रोहतगीला खडसावले

एका युजरने रोहतगीला सनी लिओनीकडे तुझ्यापेक्षा जास्त आत्मसन्मान असल्याचे म्हटले.

तर एकाने दंगल सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग म्हणत ‘म्हारी पायल किसी पॉर्न स्टारसे कम है के असा टोला लगावला.’

तसेच एका युजरने ‘तू स्मृती इराणी होण्याचा प्रयत्न करत आहेस का’ असा सवाल केला.

पायल रोहतगी विषयी

2017 मध्ये विमानतळावरील घटनेला जातीय वळण दिल्यामुळे तिला ट्रोल व्हावं लागलं होतं.

रोहतगीने काही बी-ग्रेड बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे.

याशिवाय 2008 मध्ये बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातही ती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.