Wed. Jan 19th, 2022

मोदी पुन्हा सत्तेत आले तरच काश्मीर प्रश्नी चर्चा – इम्रान खान

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूकीनंतर पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीर प्रश्नी चर्चा होईल अशी शक्यता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वर्तवली आहे.त्याचप्रमाणे काँग्रेस सत्तेत आल्यास ही चर्चा होणं शक्य नाही असं ही स्पष्ट केलं आहे.‘भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर त्यांना आम्ही उत्तर दिलं नसतं तर लोकांकडून आमच्यावर टीका झाल्या असत्या असंही त्यांनी सांगितलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले इम्रान खान?

नरेंद्र मोदी निवडणूकीनंतर पुन्हा सत्तेत काश्मीर प्रश्नी चर्चा होईल.

काँग्रेस सत्तेत आल्यास ही चर्चा होणं शक्य नाही असं ही स्पष्ट केलं आहे.

निवडणुकीआधीचे आणि  निवडणुकीनंतरचे असे दोन मोदी आपल्याला पहायला मिळतील.

पुलवामा दहशतवादी हल्ला त्यानंतर एअर स्ट्राइक यामुळे भारत – पाकिस्तानमध्ये  तणाव निर्माण झाला.

यानंतर इम्रान खान यांनी असं म्हटल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.

दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहे असा दावा त्यांनी केला आहे.

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरसंबंधी खरचं अंडरग्राऊंड झाला असल्याचं त्यांनी सांगीतलं आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *