नवरात्री स्पेशल रेसिपी – पीनट लाडू
नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे, या उत्सवात 9 दिवस देवीची आराधना केली जाते, तसेच 9 दिवस उपवासही केला जातो यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल सोपी आणि झटपट रेसिपी घेऊन आलो आहोत. ही तुम्ही झटपट रेसिपी तुम्ही नक्की बनवून पाहा.
साहित्य
- कच्चे शेंगदाणे – 1/2 कप
- खजूर – 8 किंवा चवीनुसार
- वेलची पावडर – ½ टी स्पून
- तूप – 1 टेस्पून
- मनुका
कृती
- प्रथम पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घ्या, त्यानंतर शेंगदाणे थंड झाले की मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवा.
- पॅनमध्ये तूप टाका त्यात बारीक केलेले खजूर, शेंगदाणे पावडर आणि वेलची पावडर घाला, हे मिश्रण मंद आचेवर शिजवा.
- मिश्रण ठंड झाल्यावर त्याचे लाडूच्या आकाराचे छोटे गोळे करा.
- प्रत्येक लाडूवर सजावटीसाठी एक एक किशमिश लावा.