Thu. Sep 19th, 2019

पेंग्विन्समुळे वीरमाता जिजाबाई उद्यानाला ‘इतका’ फायदा!

0Shares

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेंग्विनचं आगमन झाल्यापासून उद्यानाला चांगलाच फायदा झाला आहे. यापूर्वी उद्यानाचं वार्षिक उत्पन्न 73 लाख रुपये होतं. मात्र पेंग्विंन्स आणल्यानंतर हे उत्पन्न चक्क पाचपट वाढल्याचं दिसून आलंय.

 

पेंग्विनची शुभ पावलं!

जेव्हा वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेंग्विन आणण्याचा निर्णय मुंबई महापालिकेतर्फे घेण्यात आला, तेव्हा त्यावर टीका झाली होती.

पेंग्विन्स सांभाळण्याचा खर्च BMC झेपेल का, असा टीकाकारांचा सूर होता.

तसंच पेंग्विंन्स मुंबईच्या वातावरणात वाचायची शक्यता कमी असल्यामुळे त्याबद्दलही तक्रार होत होती.

मात्र पेंग्विन्स आल्यापासून लोकांची पेंग्विंन्स पाहायला गर्दी होऊ लागली.

उद्यानाचं 2 ते 3 रुपये असणारं तिकीट प्रति कुटुंबाला म्हणजे 2 पालक आणि दोन मुलं यांना 100 रुपये ठेवण्यात आलं.

BMC शाळेच्या विद्यार्थ्यांना पेंग्विन्स पाहायची सोय मोफत ठेण्यात आली.

पेंग्विन्स पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली.

यामुळे या उद्यानाच्या उत्पन्नात घसघशीत वाढ झाली. वर्षाकाठी 50 ते 75 लाखांत असणारं राणीच्या बागेचं उत्पन्न थेट 5 कोटींवर जाऊन पोहोचलं आहे. याचा उद्यानाला चांगलाच फायदा झाला आहे. इतर प्राणी पक्षीही उद्यानात दाखल करण्यात आले आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *