Sat. Nov 27th, 2021

मीरजमध्ये शपथविधीनिमित्त फ्री हेअर कट आणि दाढी

लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीए 354 जागी निवडून आली आहे. कॉंग्रेसचा दारूण पराभव केल्यामुळे भाजपा कॉंग्रेसला चांगलीच महगात पडली आहे. जनतेने पूर्ण बहुमत दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर विराजमान होणार आहे. भाजपाला बहुमत मिळाल्यामुळे अनेकांना प्रचंड आनंद झाला. एकीकडे मोदींचे चित्र कुल्फीवर काढलेले दिसले तर दुसरीकडे मोदींचे नाव छातीवर कोरले. मात्र मिरजमध्ये सलून मालकाने चक्क शपथविधीच्या दिवशी फ्री हेअर कट आणि दाढी करून देणार असल्याचे म्हटलं आहे.

काय आहे नेमका हा प्रकार ?

30 मे रोजी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पदासाठी शपथ घेणार आहे.

बहुमताने भाजपा सत्ता स्थापन करणार म्हणून मीरजच्या एका सलून मालकाने एक नवीन सेवा आणली आहे.

शपथविधीच्या दिनी मीरजचे सलून मालक यांनी फ्री हेअर कट आणि दाढी करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

मिरजच्या ब्राम्हण पुरीमध्ये श्री जेन्ट्स पार्लरचे मालक उमेश कदम यांनी मोदींच्या प्रेमाखातर ही सेवा ठेवली आहे.

गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध असणार आहे.

तसेच या सेवेचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असे उमेश यांनी आवाहन केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *