Jaimaharashtra news

बेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत ?

 

मुंबई (०७/०९/२०२१): बेळगाव महानगपालिका निवडणुकांचे निकाल कालच जाहीर करण्यात आले. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत मराठी एकीकरण समितीचा पराभव झाला. भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले. तसेच निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकांमध्ये मराठी भाषिक नगरसेवकांची संख्या लक्षणीय आहे. मराठी एकीकरण समितीचा पराभव कुणामुळे झाला, याविषयी जय महाराष्ट्र वृत्तसंस्थेच्या वतीने एक ट्विटर पोल घेण्यात आला होता.

 

ट्विटर पोलमध्ये सहभागी होणाऱ्यांना एकूण तीन पर्याय देण्यात आले होते.

मराठी एकीकरण समितीचा पराभव कुणामुळे?

१. स्वतःमुळे

२. शिवसेनेमुळे

३. भाजपमुळे

सहभागी झालेल्यांपैकी एकूण ७१ टक्के नागरिकांनी पराभवासाठी शिवसेनेला जबाबदार धरले आहे. तर १२ टक्के नागरिकांनी मराठी एकीकरण समितीलाच जबाबदार धरले आहे. समितीचा पराभव भाजपमुळे झाला असे एकूण १७ टक्के लोकांचे म्हणणे आहे.

 

शिवसेनेमुळे मराठी एकीकरण समितीचा पराभव झाला, असे सर्वाधिक नागरिकांचे म्हणणे असल्याचे दिसून आले आहे.

Exit mobile version