Jaimaharashtra news

‘यंदा गणेशोत्सवात चाकरमानी चिपी विमानतळावर उतरू शकतील’

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाची खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी पाहणी केली होती. कोकणासाठी सिंधुदुर्गातील चिपीचे विमानतळ महत्त्वाचे ठरणार असून त्याच्या बहुतांशी बांधकामावर अखेरचा हात फिरवला जात आहे. याची पाहणी आटोपल्यावर राऊत यांनी म्हटलं की, डीजीसीएने प्रवासी वाहतुकीचा परवाना दिल्यानंतर चिपी विमानतळावर हवाई वाहतूक सुरु होऊ शकेल. ज्यामुळे, यंदा गणेशोत्सवात चाकरमानी चिपी विमानतळावर उतरू शकतील.

Exit mobile version