Wed. Jun 26th, 2019

‘भाजपला पंतप्रधानांची लाज वाटली पाहिजे’ राहुल गांधींची मोदींवर टीका

0Shares

रायबरेलीत एका सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी PM नरेंद्र मोदींवर टीका केली. “BJP ने अमेठी आणि रायबरेलीला काहीही दिलेले नसून जे होतं, ते पण ओरबाडून घेतलं आहे. त्यामुळे BJP चे लोक इथे आल्यास त्यांना सांगा की तुम्हाला पंतप्रधानांची लाज वाटली पाहिजे’, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

राहूल गांधींची टीका

इथे महामार्ग, फूडपार्क बनणार होतं पण बनलं नाही.

पंतप्रधान पहिले देवाचं नाव घेतात त्यानंतर खोटं बोलतात.

त्यांनी तरुणाना नोकरी दिली नाही, 15 लाख रुपयेही दिले नाही.

त्यामुळे BJPची लोकं इथे आल्यास त्यांना सांगा की, तुम्हाला पंतप्रधानांची लाज वाटली पाहिजे.

केंद्रात आमचं सरकार आल्यास अमेठी आणि रायबरेलीचा विकास होईल.

काँग्रेस लोकसभेसाठी उत्तर प्रदेशात पूर्ण ताकदीने लढणार आहे.

मायावती, अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव यांचा आम्ही सन्मान करतो.

मात्र आमच्या विचारधारेसाठी आम्ही लढणार.

अमेठी आणि रायबरेलीशी माझं राजकीय नाही, तर कौटुंबिक नातं आहे.

मी कुठेही गेलो तरी येथील जनतेसाठी काम करतच राहीन.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: