Tue. Oct 27th, 2020

लातूर जिल्ह्यातील औसा येथील नागरिक पाण्याच्या घागरी घेऊन रस्त्यावर!

राज्यात एकीकडे पाण्याचा महापूर आहे तर दुसरीकडे पाण्याचा प्रचंड दुष्काळ दोन्हीकडे पाण्यामुळेच सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पण्यासाठी शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील औसा येथील नागरिक रस्त्यावर उतरले. पाण्याच्या घागरी घेऊन धरणे आंदोलनासह कडकडीत औसामध्ये बंद पुकारण्यात आलाय.

पाण्यासाठी औसेकर आता रस्त्यावर उतरले आहेत.

गेल्या चार महिन्यापासून औसा शहराचा पाणीपुरवठा बंद आहे.

औसा शहराला तावरजा धरणातून पाणी पुरवठा केला जात होता.

पाणीपुरवठा करणारं धरणच कोरडं पडल्याने औसा शहराला इतर पाण्याच्या स्रोतांवर पाणीपुरवठा होत होता.

मात्र भर पावसाळ्यात पाण्याचे हे स्रोतही अटले आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यामध्ये पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे.

माकणी धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची 40 कोटीच्या योजनेला तांत्रिक मान्यता मिळाली होती. प्रशासकीय मान्यता नसल्याने कारभार लालफितीत अडकून पडलाय. त्यामुळे औसा शहरातील सर्व पक्षीय लोक विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, पत्रकार, महिला बचत गट यांनी एकत्र येत औसा एक दिवसासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भर पावसाळ्यात औसेकरांवर पाण्यासाठीची धरणे आंदोलनासह औसा बंद करवा लागलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *