देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची कायमस्वरूपी जपणूक – मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या राजभवनात क्रांतीकारकांच्या कार्याची चिरंतन जपणूक व्हावी यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्क्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात क्रांतिकारक गॅलरीमुळे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची जपणूक कायमस्वरूपी झालीय असं नमूद केलं आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना क्रांतिगाथा या दालनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. हा एक चांगला मुहूर्त आहे. आपण जे स्वातंत्र्य भोगतोय त्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीसाठी क्रांतीकारकांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. हा इतिहास जिवंत करणं आपलं काम आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
राजभवनातील या दालनात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीसाठी बलिदान केलेल्या अनेक अनाम वीरांचे कार्य नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे या दालनामुळे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची जपणूक कायमस्वरुपी झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच पुढच्या पिढीला ज्या गोष्टी द्यायच्या आहेत. ते केलं नाही तर आपण आपल्या कर्तव्याला भुगतो आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.