राष्ट्रवादीचे दोन नेते तुरुंगातून रुग्णालयात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ईडीच्या कोठडीत आहे. नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे दोन नेते तुरुंगातून रुग्णालयात जाणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात उपाचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर अनिल देशमुखांवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवाब मलिक यांना न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. मलिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. मुंबईतील कुर्ल्याच्या क्रिटीकेअर रुग्णालयात मलिकांना उपचार घेण्यासाठी सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. तसेच परिवारातील एका व्यक्तीला मलिकांसोबत उपाचारादरम्यान उपस्थित राहायची मुभा न्यायालयाने दिली आहे.
नवाब मलिक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने २३ फेब्रुवारी रोजी अटक केली. दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. तसेच ईडीने मलिकांच्या विरोधात ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. मागील सुनावणीनुसार मलिकांच्या कोठडीत वाढ करण्यात आली असून न्यायालयाने त्यांच्या कोठडीत २० मेपर्यंत वाढ केली आहे.
दरम्यान, आता मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी दिली आहे. मुंबईतील कुर्ल्याच्या क्रिटीकेअर रुग्णालयात नवाब मलिक यांना उपचार घेण्यासाठी सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे.