Wed. Oct 5th, 2022

मुंबईत राज ठाकरेंच्या सभेचा मार्ग मोकळा

राज ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार, सभेला अखेर परवानगी 24 एप्रिलला होणाऱ्या सभेला परवानगी मिळाली नसल्याने मुंबईत त्यांची सभा होणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.परंतु या सभेला परवानगी मिळाली असून ही सभा 24 एप्रिल ऐवजी 23 एप्रिलला अभुदय नगर काळाचौकी येथील शाहिद भगतसिंग नगर मैदानात होणार आहे. मिलिंद देवरा यांच्या मतदारसंघात ही सभा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या सभेतून केंद्र आणि राज्यातील भाजपच्या सरकारवर व्हिडीओच्या माध्यमातून टीका होत आहे. भाजपच्या सरकारची राज ठाकरे मुंबईत कोणावर तोफ डागणार यावर सर्वांच लक्ष लागलं आहे.

मुंबईत 23 एप्रिलला राज ठाकरेंची सभा

मनसेने  राज ठाकरे यांच्या सभेसाठी मुंबई महापालिका आणि निवडणूक आयोगाकडे  परवानगी मागितली होती.

मात्र या सभेसाठी मुंबई  महापालिकेकडून  परवानगी नाकारण्यात आली आहे.

सभेला परवानगी नाकारल्याचे  तीव्र पडसाद उमटल्यामुळे  निवडणूक आयोग आणि महापालिकेने या सभेला परवानगी दिली आहे.

राज यांची सभा काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात २३ एप्रिल रोजी  ही सभा होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील एक खिडकी योजना अंतर्गत या सभेला परवानगी देण्यात आली आहे

राज यांनी पुणे, सातारा, महाड, नांदेड, सोलापूर, इचलकरंजी या ठिकाणी सभा घेऊन केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.

त्यामुळे मुंबईतल्या सभेत राज भाजपबरोबरच शिवसेनेवरही टीकास्त्र सोडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.