Tue. Dec 7th, 2021

काटोल विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीला अंतरिम स्थगिती

नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 2 एप्रिल पर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे. काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे यांनी ही निवडणूक घेऊ नये अशी याचिका कोर्टात दाखल केली होती.

आशिष देशमुख यांनी 6 ऑक्टोबर 2018 ला राजीनामा दिला.

त्यामुळे नियमानुसार सहा महिन्याच्या आत 6 एप्रिल 2019 पर्यंत निवडणूक घेणं बंधनकारक होतं.

मात्र निवडणूक आयोगाने तेव्हा निवडणूक घेतल्या नव्हत्या.

लोकसभा निवडणुकीसोबत 11 एप्रिलला काटोल पोट निवडणुकीसाठी मतदान झालं असलं, तरी पुढची प्रक्रिया निकालाच्या दिवशी 23 मे पर्यंत पार पडणार असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.

आता तीन महिन्यांसाठी का निवडणुका घेत आहेत, याचं उत्तर न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारलं आहे.

निवडून आलेल्या आमदाराला पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत केवळ 3 महिन्यांचा कालावधी मिळेल.

त्यामुळे नवनियुक्त आमदाराला मतदार संघाच्या विकासासाठी काही करता येणार नाही.

शिवाय 3 महिन्यांसाठी आमदार निवडणून दिल्यावर पुन्हा निवडणूक लागेल ज्यामुळे निवडणुकीसाठी होणारा खर्च टाळावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

त्यामुळे सर्व बाबीचा विचार करत आणि आयोगाची बाजू ऐकून घेण्यासाठी न्यायालयाने 2 एप्रिलपर्यंत निवडणूक प्रक्रियेस स्थगिती दिली आहे.

असून राज्य निवडणूक आयोग व केंद्रीय निवडणूक आयोगाला 2 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *