Sun. Oct 17th, 2021

‘सुट्या पेट्रोल आणि ॲसीड सारखे ज्वलनशील पदार्थावर बंदी आणावी’

हिंगणघाटची पुनरावृत्ती आज नाशकातील लासलगाव येथे घडली. एका महिलेवर एसटी डेपोत चार-पाच तरुणांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये ही महिला ४० टक्के जळाली असल्याची माहिती मिळते आहे.

या प्रकरणावर भाजपच्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत.

काय म्हणाल्या चित्रा वाघ ?

लासलगाव मध्ये पुन्हा एकदा वेदनादायक घटना घडली आहे. त्या महिलेला जिवंत जाळण्यात आलं. गेल्या १५ दिवसांतील ही सातवी घटना आहे. कुठेतरी जळण्याचं सत्र या राज्यात सुरु आहे, असं वाटायला लागलंय.

जो पर्यंत आपल्या ओळखीची पिडीता आपली वाटत नाही, तोपर्यंत त्या वेदनांची तीव्रता कळत नाही की काय, असं वाटायला लागलंय.

हा माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्र नाही. या व्हिडीओच्या माध्यामातून मला सरकारला सांगायचंय, पेट्रोलपंपावर मिळणार सुट्ट पेट्रोल आणि एसिड सदृश केमिकलवर बंदी आणावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी सरकारकडे केली आहे.

हरामखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतात, त्या लवकरात लवकर अमलात आणा.

फास्ट ट्रॅक कोर्टवर या केसेस चालवून जमणार नाही. तर महिन्याभरात अशा प्रकरणांचा निकाल लागला पाहिजे. तो पर्यंत नराधमांवर जरब बसणार नाही. आजच्या तारखेला कायदा सुव्यावस्थेचा बोजवारा उडाला आहे.

कायद्याची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी. तसेच हरामखोरांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

नाशिकमध्ये महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *