पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार

गेले अनेक दिवस इंधनावरील दराने शंभरी गाठल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत होती. मात्र, सामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनावरील दर स्वस्त केले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. पेट्रोल प्रति लिटर ९.५० रुपयांनी कमी होणार आहे. तर डिझेल प्रति लीटर ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे. यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे.
देशात महागाई आणि गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलची सातत्यानं दरवाढ होत आहे. यामुळे सामान्यांचे बजेट कोसळले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने इंधर दरकपात करत सामान्यांना दिलासा दिला आहे. गेल्या मागील वर्षी ४ नोव्हेंब रोजी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात १० रुपयांनी कपात केली होती. त्यांनंतर आता पेट्रोल प्रति लिटर ९.५० रुपयांनी कमी तर, डिझेल प्रति लीटर ७ रुपयांनी स्वस्त होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
देशभरात भाजपा शासित आणि बिगर भाजपा शासित राज्यात इंधनाचे दर काय आहेत?
- महाराष्ट्र १२१.५१ रुपये
- राजस्थान ११७.८७ रुपये
- बंगाल ११५.८८ रुपये
- केरळ ११५.४५ रुपये
- हिमाचल प्रदेश १०४.२६ रुपये
- उत्तर प्रदेश १०५.४५ रुपये
- आसाम १०६.०२ रुपये
- हरियाणा १०६.०२ रुपये