Fri. Aug 12th, 2022

2 दिवसांच्या ब्रेकनंतर आज पुन्हा इंधन दरवाढ

आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढीचा झटका देणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये 2 दिवसांच्या ब्रेकनंतर आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

पेट्रोल 22 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागलं आहे.

पेट्रोलने आधीच नव्वदी पार केली असून लवकरच शंभरी गाठेल अशी भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

आज झालेल्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर 90.66 रुपये प्रति लिटर झाला असून डिझेलचा दर 79.09 रुपये प्रति लिटर झाला आहे

गेले 2 दिवस दरवाढीला ब्रेक लागला होता. मात्र आज पुन्हा एकदा इंधनात दरवाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.