Wed. Jun 29th, 2022

भाजपशासित राज्यात इंधन स्वस्त

देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांची कोरोना आढावा बैठक घेतली. पंतप्रधान मोदींनी दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून कोरोना रुग्णवाढीसह इतर मुद्द्यावरही चर्चा केली आहे. ‘पेट्रोल-डिझेल स्वस्त करा’ असं मोदी यांनी राज्यांना सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुख्यमंत्री परिषदेत इंधनदर भाजपाशासित राज्यात स्वस्त तर बिगर भाजपाशासित राज्यात इंधन महाग असल्याचे सांगितले. देशात महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, तेलंगना, आंध्रप्रदेश, केरळ, झारखंड, लक्षद्वीप ही राज्य बिगर भाजप शासित आहेत. या राज्यांमध्ये इंधनाचे दर जास्त असून इंधनावरील दर कमी करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

नवी दिल्लीत अशी ठरते प्रतिलिटर पेट्रोलची किंमत

मूळ किंमत                           ५ रुपये ३२ पैसे

वाहतूक खर्च                                    २० पैसे

वितरकांचा हिस्सा                ५६ रुपये ५२ पैसे

अबकारी                            २७ रुपये ९० पैसे

वितरकांचं कमिशन               ३ रुपये ८६ पैसे

मूल्यवर्धित कर                     १७ रुपये १३ पैसे

ग्राहकांसाठी किंमत            १०३ रुपये ४१ पैसे

वॅटमधून राज्यांची कमाई

महाराष्ट्र – ३४७२ कोटी

दिल्ली – १७३ कोटी

प.बंगाल – १३४३ कोटी

तामिळनाडू – २९२४ कोटी

तेलंगाना – १३०२ कोटी

आंध्रप्रदेश – १३७१ कोटी

केरळ – ११८७ कोटी

झारखंड – ६६४ कोटी

लक्षद्वीप – ५ कोटी

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.