Jaimaharashtra news

पेट्रोल-डिझेलच्या आकाशाला भिडलेल्या किमती

पेट्रोल-डिझेलच्या आकाशाला भिडलेल्या किमतींपायी झालेल्या सर्वदूर महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असले तरी  मात्र हीच बाब मोठी लाभकारक ठरली आहे. इंधनावरील उत्पादन शुल्कात गेल्या वर्षी मे महिन्यात केंद्राकडून विक्रमी वाढ केली गेली, त्यामुळे ३१ मार्च २०२१ रोजी समाप्त आर्थिक वर्षांत सरकारच्या तिजोरीत ३.३५ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे, जी आधीच्या वर्षांच्या तुलनेत ८८ टक्क्य़ांनी वाढली आहे. याबाबत लोकसभेत केंद्र सरकारकडूनच माहिती देण्यात आली आहे.

पेट्रोलवरील उत्पादन शुल्क लिटरमागे १९.९८ रुपयांवरून ३२.९ रुपयांवर गेले, तर डिझेलवरील उत्पादन शुल्कही यातून प्रति लिटर १५.८३ रुपयांवरून, ३१.८ रुपयांवर गेले. करवाढीचा परिणाम म्हणून एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या दरम्यान सरकारच्या तिजोरीत केवळ पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन कराद्वारे ३.८९ लाख कोटी रुपये जमा झाले. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० मध्ये हे कर उत्पन्न १.७८ लाख कोटी रुपये होते. चालू वर्षांच्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल २०२१ ते जून २०२१ केंद्राने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन करापोटी १.०१ लाख कोटी रुपये कमावले आहेत.

 आर्थिक वर्ष इंधन करापोटी उत्पन्न

  २०१८-१९ २.१३ लाख कोटी

  २०१९-२० १.७८ लाख कोटी

  २०२०-२१ ३.८९ लाख कोटी

  २०२१-२२ १.०१ लाख कोटी

Exit mobile version