पेट्रोलच्या किंमतीने शंभरी ओलांडली
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा विक्रम…

कोरोना महामारीच्या संकटामुळे आधीच त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेल कंपन्यांनी वाढवलेल्या किंमतीमुळे देशात सलग ७व्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. नवीन किमतीनुसार आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८९ रूपये होता, म्हणजे कालपेक्षा त्यात २६ पैश्यांची वाढ झाली. मुंबईमध्ये सध्या पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९५ रूपयांपेक्षा जास्त होती. तर परभणी येथे प्रीमियम पेट्रोलच्या किंमतीने शंभरी ओलांडली आहे.
महाराष्ट्रात नाही तर दुसऱ्या राज्यात देखील पेट्रोलचे दर वाढल्यानं लोक त्रस्त झाले आहे. राजस्थानची राजधान जयपूर येथे पेट्रोलचा दर ९५ रूपये ५१ पैसे होता तर श्रीगंगानगर येथे प्रतिलिटर दराने शंभरचा टप्पा गाठला. कोलकत्त्यामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ९०.२५ रुपये होती तर बंगळुरु (९१.९७ रुपये), हैदराबाद (९२.५३ रुपये), पटना (९१.६७ रुपये) आणि तिरुवनंतपुरम (९०.८७ रुपये) असे दर वाढले आहे.
जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या दराने प्रति बॅरल 60 डॉलरचा टप्पा पार केल्यामुळं जगभरात इंधनाच्या दरात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामुळे कर आकारणीच्या उच्च दरामुळे इंधनाचे दर आधीच जास्त आहेत. अशा भारतासारख्या देशांमध्ये तीव्र परिणाम होऊ शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही वरील करांचे सर्वाधिक दर भारतामध्ये आहेत.