देशातील पेट्रोल-डिझेलचे दर गुरुवारी स्थिर

भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर आज (गुरुवारी) सर्व सामान्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. देशातील पेट्रोल-डिझेलचे दर गुरुवारी स्थिर आहेत.
देशात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत होती. तब्बल १३७ दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली असून २२ आणि २३ मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये ८० ते ८५ पैशांनी वाढ करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर आज मात्र इंधनाच्या किंमती स्थिर आहेत.
देशातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर (प्रति लिटर) काय?
मुंबई पेट्रोल १११.६७ डिझेल ९५.८५
दिल्ली पेट्रोल ९७.०१ डिझेल ८८.२७
चेन्नई पेट्रोल १०२.०१ डिझेल ९२.९५
कोलकाता पेट्रोल १०६.३४ डिझेल ९१.४२