Wed. Aug 10th, 2022

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावले

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढताना दिसत होते. परंतु, आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी जारी केल्या इंधनाच्या दरानुसार, पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

गुरुवारी सादर केलेल्या दरवाढीनुसार, पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रत्येकी ८४-८४ पैशांची वाढ करण्यात आली होती. गेल्या दहा दिवसांमध्ये नवव्यांदा इंधनात दरवाढ करण्यात आली. त्यामुळे नव्या दरवाढीनुसार, मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिल लिटर ११६.७२ रुपये झाले आहे तर डिझेल १००.९४ प्रतिलिटर रुपये झाले आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर (प्रति लिटर)

मुंबई            पेट्रोल ११६.७२   डिझेल  १००.९४

औरंगाबाद   पेट्रोल ११६.५३   डिझेल ९९.२३

कोल्हापूर     पेट्रोल ११५.७१   डिझेल ९८.४७

पुणे              पेट्रोल ११५.३७   डिझेल ९८.१२

नागपूर         पेट्रोल ११५.८०   डिझेल ९८.३७

व्यावसायिक एलपीजीच्या दरात वाढ

शुक्रवारी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावले आहेत. मात्र, पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता व्यावसायिक एलपीजीच्या दरात वाढ झाली आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २५० रुपयांनी वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.