पेट्रोल – डिझेलचे दर वाढले
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय तेलकंपन्यांनी घेतला आहे. पेट्रोल प्रतीलिटर 1 रुपये 39 पैसे तर डिझेल 1 रुपये 04 पैशांनी महाग झाले आहे.
आजपासून हे नवे दर लागू झालेत. यापूर्वी 1 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली होती. पेट्रोल प्रतीलिटर 3 रुपये 77 पैशांनी तर डिझेल प्रतीलिटर 2 रुपये 91 पैशांनी स्वस्त झालं होतं.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते.
दरम्यान, सोने-चांदीच्या दराप्रमाणे यापुढे आता दररोज पेट्रोल-डिझेलचेही दर ठरणार आहेत. 1 मेपासून सुरुवातीला पाँडेचरी, विशाखापट्टणम, उदयपूर, जमशेदपूर आणि चंदीगढ या 5 शहरांत दररोज पेट्रोल-डिझेलचे नवे दर पाहायला
मिळतील.