पेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर
राज्यात आजही पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 11 पैशांनी वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 89.89 रुपये मोजावे लागत आहेत. तर सलग चौथ्या दिवशी डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे डिझेलचा दर 78.42 रुपयांवर स्थिर आहे.
दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात वाढ होत असल्यानं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांमध्ये डिझेलचे दर वाढलेले नाहीत. मात्र त्याआधीच्या 13 दिवसांमध्ये डिझेलच्या दरात जवळपास दीड रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे वाहतूक खर्चही वाढला आहे. परिणामी सर्वसामान्य जनता महागाईनं होरपळून गेली आहे.