पुण्यात पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण

पुण्याच्या शिंदे पेट्रोल पंपावर सहा जणांच्या टोळक्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला क्षुल्लक कारणावरुन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सहा जणांनी कर्मचाऱ्याला तलवारीचा धाक दाखवून लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सुनील असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी हिंजेवाडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
नेमकं काय घडलं ?
29 जानेवारीला साडेअकरा वाजताच्या सुमारास सहा आरोपी पेट्रोल भरण्यासाठी आले.
यावेळी आरोपीने सुनीलवर दमदाटी करत आम्ही गाववाले आहोत,आमच्या गाडीत आधी पेट्रोल भर असे धमकावले.
सुनील आणि आरोपींमध्ये बाचाबाची झाली.
सुनीलला तलवारीचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि फरार झाले.
हिंजेवाडी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.