Sat. Apr 20th, 2019

‘या’ प्रश्नाचं उत्तर देऊन कॅटरिओना इलिसा बनली ‘मिस युनिवर्स’

0Shares

फिलीपीन्सची कॅटरिओना इलिसा ग्रे 2018 ची मिस युनिवर्स ठरली आहे. थायलंडच्या बँकॉकमध्ये या वर्षीच्या 67 व्या मिस युनिवर्सचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आफ्रिकेची स्पर्धक दुसऱ्या स्थानी आहे तर व्हेनेझुएलाची स्पर्धक 3 ऱ्या स्थानी आहे. 

या प्रश्नाचे दिले उत्तर –
तुमच्या जीवनात तुम्ही सर्वात महत्वपूर्ण गोष्ट कोणती शिकलात आणि ‘मिस युनिवर्स’ म्हणून तुम्ही त्याचा आपल्या जीवनात कसा उपयोग कराल, असा प्रश्न केटरिओना इलिसा ग्रे हिला स्पर्धेत विचारण्यात आला होता. 
या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली की, “मी मनिलाच्या वस्तीमध्ये बरच काम केलं आहे, तेथील गरीबी पहिली आहे. तेथील दुःखाने भरलेले जीवन पाहिले आहे. असं असलं तरी तेथील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि सौंदर्यदेखील पाहिलं आहे. एक मिस युनिवर्स म्हणून मी प्रत्येक वाईट परिस्थितीतही सुख शोधण्याचा माझा प्रयत्न असेल. जर मी लोकांना उपकृत राहणं जरी शिकवू शकले तर या जगातील नकारात्मकता कमी होईल आणि मुलांच्या चेहऱ्यावर कायम हसू पहायला मिळेल. 
 
तिच्या या उत्तराने परीक्षकांची तिने मन जिंकली आणि तिला ‘मिस युनिव्हर्स’ म्हणून घोषित करण्यात आले. 
 
या स्पर्धेत 93 देशातील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. या सर्वांना मागे टाकत कॅटरिओना इलिसा ग्रे चौथी फिलीपीस्न सौंदर्यवती ठरली. 
मिस युनिवर्स ठरलेली केटरिओना 24 वर्षीची असून ती सूत्रसंचालक आणि गायिका म्हणून देखील प्रसिध्द आहे.
या स्पर्धेत भारताची नेहल चुडासमा देखील सहभागी झाली होती पण तीला पहिल्या 20 मध्ये स्थान मिळवता आले नाही.  
ट्रान्सजेंडर सौंदर्यवतीचा सहभाग-
यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले ते यावर्षी यात पहिल्यादांच एका ट्रान्सजेडरचा सहभाग झाला होता, ऑंजेलिना पोन्स असे या सौंदर्यवतीचे नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *