गोंदियात शिवशाही बसचा अपघात टळला; 30 प्रवासी सुखरूप
राकेश रामटेके. प्रतिनिधी. गोंदिया: ''काळ आला होता पण वेळ आली नाही'', ही म्हण खरी ठरली आहे.
गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवशाही बसचा अपघात होता होता वाचला.
गोंदियावरून नागपूरसाठी निघालेली बस ही सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाजवळून जात असताना बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिवशाही बस रस्त्याच्या कडेला गेली.
यादरम्यान, बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. मात्र कोणत्याही प्रवासाला इजा झाली नाही.
मात्र, या घटनेमुळे बसचे मोठे नुकसान झाले. तसेच, या घटनेमुळे काही काळासाठी वाहतुक विस्कळीत झाली होती.