MAHAVIR JAYANTI 2025: विविध राज्यांत महावीर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम उत्साहात
महावीर जयंती हा दिवस समस्त जैन धर्मातील लोकांसाठी अत्यंत महान आणि आध्यात्मिक मूल्यांचा आहे.
या दिवशी समस्त जैन बांधव आणि भगिनी भगवान महावीर यांच्या अहिंसा, सत्य आणि करुणेच्या शिकवणींचे स्मरण करतात.
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 13 व्या दिवशी महावीर जयंती विविध शहरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
महावीर जयंतीनिमित्त चेन्नईमधील भक्तांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. भगवान महावीर यांच्या वारशाच्या सन्मानार्थ भाविकांनी सांस्कृतिक प्रदर्शने सादर केली.
हैदराबादमधील जैन समुदायाच्या सदस्यांनी महावीर जयंतीनिमित्त प्रार्थना केली आणि धार्मिक विधींमध्ये भाग घेतला.
पाटणा येथील समस्त जैन समुदायातील सदस्यांनी महावीर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढली आणि शांतीचा संदेश दिला. ज्यामुळे हा भव्य उत्सव पाहण्यासाठी शहरभरातून गर्दी जमली होती.
महावीर जयंतीनिमित्त रांची येथे भव्य मिरवणूक पाहायला मिळाली. भगवान महावीर यांच्या जन्मदिनाच्या सन्मानार्थ भाविकांनी जलभिषेक केला.
मुंबईमध्ये समस्त जैन समाजातील महिलांनी आणि महिला साधूंनी महावीर जयंती भक्तीभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरी केली आणि एका उत्साही मिरवणुकीत देखील भाग घेतला.