Wednesday, April 22, 2026 11:17:01 PM

शुभ मंगल सावधान! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डे अडकली लग्नबंधनात; लग्नातील धम्माल PHOTO समोर

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डे नुकतीच लग्नबंधनात अडकली असून नवऱ्याबरोबरचा तिचा पहिला फोटो समोर आला आहे.

शुभ मंगल सावधान!

शुभ मंगल सावधान! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डे अडकली लग्नबंधनात; लग्नातील धम्माल PHOTO समोर

शुभ मंगल सावधान!

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डे हिच्या लग्नाचे फोटो समोर येताच चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डे नुकतीच लग्नबंधनात अडकली.

शुभ मंगल सावधान!

ईशाच्या ग्रहमखाचे फोटो समोर आले आणि तिच्या लग्नाबाबत चर्चा सुरु झाली, त्याचसोबत ईशा डे ज्याच्यासोबत लग्नबंधनात अडकली तो तिचा नवरा कोण? याबाब चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली.

शुभ मंगल सावधान!

11 मार्च रोजी ईशाने लेखक अभिषेक खणकरसोबत लग्न केलं असून नवऱ्याबरोबरचा तिचा पहिला फोटो समोर आला आहे. लग्नात ईशाने लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर अभिषेकनं मेहंदी रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केलं होतं.

शुभ मंगल सावधान!

अभिषेक खणकर हे लेखक आणि गीतकार आहे. ''लक्ष्मी निवास'' आणि ''खुलता कळी खुलेना'' यांसारख्या मालिकांची शीर्षक गीते त्याने लिहली आहेत. तसेच ईशाने देखील ''गुलकंद'' या चित्रपटात काम केलं आहे.

शुभ मंगल सावधान!

अभिषेक यांना राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा 2025 चा उत्कृष्ट गीताचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार ''अनन्या'' सिनेमातील ''ढगा आड़ या'' या गाण्यासाठी मिळाला आहे.

शुभ मंगल सावधान!

तिच्या लग्नसोहळ्याला महाराष्ट्राची हास्यजत्रेची संपूर्ण टीम पोहोचली होती. यात प्रियदर्शनी इंदलकर, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात, समीर चौघुले, सचिन गोस्वामी, रोहित माने, पृथ्वीक प्रताप आणि लेखक, दिग्दर्शक मकरंद देशपांडे हे देखील उपस्थित होते.



सम्बन्धित सामग्री