Saroj Khan Birth Anniversary : माधुरी दीक्षित, श्रीदेवी अन् सोनाक्षी सिन्हाला सरोज खानने गिरवले नृत्याचे धडे
सरोज खान बॉलिवूडमधील उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शिका होत्या. सरोज खान यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी मुंबईमध्ये झाला. सरोज खान यांचं मूळ नाव निर्मला नागपाल
हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला नृत्यदिग्दर्शिका म्हणून त्यांची ख्याती पसरली. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांना नृत्यदिग्दर्शन केले
सरोज खान यांच्या कारकिर्दीत त्यांनी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना नृत्याचे धडे दिले. माधुरी दीक्षित, श्रीदेवीसारख्या अनेक कलाकारांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शन केले
माधुरी दीक्षित: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या अनेक चित्रपटांतील गाण्यांसाठी सरोज खान यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. ''तेजाब'' चित्रपटातील ''एक दो तीन'', ''खलनायक'' चित्रपटातील ''चोली के पीछे'', ''बेटा'' चित्रपटातील ''धक धक'' या अविस्मरणीय गाण्यांना सरोज खान यांनी आपल्या नृत्यदिग्दर्शनानी चार चॉंद लावले
सोनाक्षी सिन्हा: 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ''राउडी राठोर'' चित्रपटातील ''छम्मक छल्लो छैन छबीली'' गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांनी केले. गाण्याचे चित्रीकरण संपल्यानंतर त्यांनी सोनाक्षीला विशेष बक्षीस देत तिचं कौतुकही केलं
ऐश्वर्या राय: ''ताल'' चित्रपटातील लोकप्रिय गाणं ''रमता जोगी'' गाण्यासाठी सरोज खान यांनी नृत्यदिग्दर्शन केले. हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. ''ताल'' या चित्रपटात ऐश्वर्याच्या नृत्यातील लय, भाव आणि ग्रेस या गाण्यात अधिक खुलून दिसले
श्रीदेवी: ''मिस्टर इंडिया'' चित्रपटातील गाणं ''हवा हवाई'' असो किंवा ''नगिना'' चित्रपटातील गाणं ''मैं तेरी दुश्मन'' आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत