खिचडी, चपाती या अन्नपदार्थांमध्ये आपण तूपाचा वापर करतो. अन्नपदार्थांची चव वाढवण्याच्या दृष्टीने तूप वापरले जाते.
तूप पचन प्रक्रिया सुलभ करते आणि पचनसंस्थेला मदत करते. यामुळे अपचन, गॅस आणि पोटातील इतर समस्या कमी होतात.
तूप मध्ये असलेले फॅटी अॅसिड्स त्वचेला हायड्रेट करतात आणि त्वचेला ताजेतवाने बनवतात. तूप खालल्याने रूप येते असे म्हणतात. पण हो तूप खालल्याने रूप येते.तूपामुळे त्वचा हायड्रेट राहते. तसेच त्वचेला ग्लो येतो.
योग्य प्रमाणात तूप खाल्ल्याने हृदयाशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात. यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स, एंटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असतात जे हृदयाला फायदा करतात.
तूप मेटाबॉलिज्मला मदत करते, आणि योग्य प्रमाणात खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.
तूपामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीरातील फ्री रॅडिकल्स आणि बॅक्टेरियाशी लढतात.
तूपामध्ये उपस्थित व्हिटॅमिन K2 हाडांच्या निरोगीपणासाठी फायदेशीर असतो.