Monday, February 10, 2025 11:28:55 AM

Los Angeles fire
लॉस एंजेलिस जंगलातील आग विझवण्यासाठी नवी आव्हाने

अमेरिकेच्या लॉस एंजेलिस जंगलातील आग विझवण्यासाठी अग्निशामकांना नवी आव्हाने

अमेरिकेच्या लॉस एंजेलिस जंगलातील आग विझवण्यासाठी अग्निशामकांना नवी आव्हाने

अमेरिकेच्या लॉस अँजलिसमधील काऊंटीच्या सहा जंगलांमध्ये भीषण आग लागली होती. गेल्या आठवड्यापासून लागलेल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आहे.

लॉस एंजेलिस जंगलातील आग विझवण्यासाठी नवी आव्हाने

आता या जंगलामध्ये ''सांता आना'' हे शक्तिशाली वारे येणार आहे. ज्यामुळे लहान ठिणग्या पुन्हा पेटतील आणि आग लवकर पसरेल. या वाऱ्याचा वेग ताशी 110 किमी असणार आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसने सांता आना या शक्तिशाली वाऱ्याविषयी सांगितले आहे.

लॉस एंजेलिस जंगलातील आग विझवण्यासाठी नवी आव्हाने

लॉस एंजेलिसमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामकांसमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत.

लॉस एंजेलिस जंगलातील आग विझवण्यासाठी नवी आव्हाने

परिसरातील झाडे कोरडी पडल्याने आग लवकर पसरण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आगीमुळे पॅसिफिक पॅलिसेड्समधील 24,000 एकर जमीन आधीच नष्ट झाली आहे आणि सुमारे 14,000 एकर अल्ताडेना समुदाय उध्वस्त झाला आहे.

लॉस एंजेलिस जंगलातील आग विझवण्यासाठी नवी आव्हाने

ईटन आणि पॅलिसेड्सची आग अजूनही भडकत आहे. ईटनच्या आगीत किमान 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पॅलिसेड्सच्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

लॉस एंजेलिस जंगलातील आग विझवण्यासाठी नवी आव्हाने

तर लॉस एंजेलिसचे अग्निशमन प्रमुख अँथनी मॅरोन यांनी कोणत्याही नव्या धोक्यांसाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

लॉस एंजेलिस जंगलातील आग विझवण्यासाठी नवी आव्हाने

वाऱ्यामुळे आग पसरण्याचा धोकाच नाही तर विषारी राखही उडून आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. सर्वांना मास्क घालण्याचे आवाहन करताना, एका आरोग्य अधिकाऱ्याने इशारा दिला आहे की राख श्वसन प्रणाली आणि शरीराच्या इतर अवयवांना हानी पोहोचवू शकते.

लॉस एंजेलिस जंगलातील आग विझवण्यासाठी नवी आव्हाने

आगीमुळे किमान 88 हजार लोकांना त्यांच्या घरातून बाहेर पडावे लागले. ज्यांची घरे विनाशकारी आगीतून वाचली, ते परत येऊ शकले नाहीत. अॅक्यु वेदरच्या (AccuWeather) म्हणण्यानुसार या दुर्घटनेची किंमत $250 अब्ज ते $275 बिलियन दरम्यान आहे.

सम्बन्धित सामग्री