डाळिंब व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. ज्यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते.
डाळिंबात भरपूर औषधी गुणधर्म असतात.
डाळिंब पौष्टिक फळ असून त्यात व्हिटॅमिन सी आणि के, फोलेट आणि पोटॅशियम भरपूर आहे.
ज्या लोकांमध्ये लोहाची कमतरता आहे. त्यांच्यासाठी डाळिंब हा उत्तम पर्याय असू शकतो. डाळिंबाच्या बियांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. जे शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.
हृदयविकारांपासून बचाव करण्यासाठीही डाळिंब खूप उपयुक्त आहे. त्यात अँटीहाइपरटेन्सिव्ह आणि अँटीएथेरोजेनिक गुणधर्म आढळतात. जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांमध्ये साचलेला प्लेक कमी करण्यास मदत करतात. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने हृदय निरोगी राहते.
डाळिंब मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. यात मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
त्वचा आणि केसांसाठी देखील डाळिंब फळ फायदेशीर आहे. डाळिंबात अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे त्वचा तरुण राहते आणि केस मजबूत होतात.
डाळिंबाच्या सेवनाने त्वचा सुधारते आणि केस गळणे थांबते.